आशिष घरत, अमोल मोरे, सदाशिव लाड; एबीपी माझा प्रतिनिधी 


Konkan Mumbai-Goa Highway Accident : कोकणासाठी (Konkan News) गुरुवार घातवार ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकापाठोपाठ एक अशा भीषण अपघातांनी (Accident News) कोकण हादरलं. सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये आज पहाटे झालेल्या दोन्ही अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे मुंबई-गोवा महामार्गावर रायगड (Raigad Accident) जवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली (Kankavali Accident News) वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 


रायगडमध्ये (Raigad) कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 9 प्रवासी जागीच गतप्राण 


पहिला अपघात रायगड जिल्ह्यात झाला. मुंबई-गोवा महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगडमधील माणगावजवळ रेपोली इथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही कार मुंबईहून गुहागरच्या दिशेने जात होती. दोनच्या सुमारात इको कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये पाच पुरुष आणि तीन महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. तर या अपघातात चार वर्षीय बालक बचावला आहे. दरम्यान, अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे.


कणकवलीत भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, तर 21 जखमी 


दुसरा अपघात हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली (Kankavali Accident) वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गडनदी पुलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. अपघातग्रस्त खासगी आराम बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. बसमधून तब्बल 36 प्रवासी प्रवास करत होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, नऊ प्रवाशांचा मृत्यू