Raigad : रायगडमध्ये (Raigad ) पुन्हा एकदा पावसाळी पर्यटनाची दुर्घटना घडली आहे. अंघोळीसाठी नदीच्या बंधाऱ्यावर गेलेल्या तिघांपैकी एकजण पाण्यात वाहून बेपत्ता झाल्याची घटना घडलीय. दुपारपासून तपासकार्य सुरु होते. मात्र, अद्यापर्यंत तपास न लागल्याने सध्या शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. जोगेश सुरेन ओरन (वय 21 वर्षे) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

Continues below advertisement

रायगड जिल्ह्यातील यंदाची पावसाळी पर्यटनाची चौथी दुर्घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर शहराजवळ असलेल्या लोहारे तुर्भे गावाजवळील एका केटी बंधाऱ्याजवळ लार्सन अँड टूब्रो कंपनीचे तिघे कामगार दुपारी आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र तिघांपैकी एकाचा तोल जाऊन पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा महाड मधील साळुंखे रेस्क्यू टीम, पोलादपूर मधील काळभैरव नाथ रेस्क्यू टीम आणि नरवीर रेस्क्यू टीम कडून शोध घेण्यात आला मात्र अद्यापही या व्यक्तीचा शोध लागलेला नाही. जोगेश सुरेन ओरन असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलादपूर पोलिस पुढील अधिक तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसापासून कोकण विभागात जोरदार पाऊस

गेल्या काही दिवसापासून कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत आहेत. मात्र, अनेकदा पर्यटक योग्य ती काळजी घेत नसल्यानं अपघाताच्या घटना घ़डत आहेत. या पावसाळ्यात आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यात चार दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळं पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती, पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन 

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. 6000 क्युसेक इतका विसर्ग गंगापूर धरणातून केल्याने गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केल्याचं बघायला मिळत आहे. अतिशय आकर्षक असलेल्या सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र प्रशासनाकडून वेळोवेळी त्यांना सूचना देण्यात आले आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा रक्षक पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे तर विसर्ग वाढविण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे.

महत्वाच्या बातम्या:

नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या