Uran: रायगड जिल्ह्यातील उरण येथील वायू विद्युत केंद्रात मोठा स्फोट (Explosion At Power Station) झाल्याची बातमी समोर येत आहे. या स्फोटात तीन कर्मचारी भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये गंभीर जखमी अभियंत्याची प्रकृती चिंताजनक असून ते सुमारे 90 टक्के भाजले असून जखमींना नवीमुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यातील अभियंता विवेक धुमाळे यांचा मृत्यू झाला आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील बोकडविरा गावानजीक असलेल्या वायू विद्युत प्रकल्पात आज दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याने भिषण अपघात झाला. यावेळी जिटीपीएस प्रकल्पातील बॉयलर प्लांटमधील एचपीबीसीपी मोटरचा स्फोट झाल्याने तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून हा प्लांट सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असताना आज झालेल्या स्फोटात एक अभियंता आणि तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. 


यामध्ये, अभियंता विवेक धुमाळे हे गंभीर जखमी झाले असून सुमारे 90 टक्क्यांपेक्षा अधिक जखमी झाले आहेत. तर दोन कर्मचारी हे काही प्रमाणात जखमी झाल्याने या जखमींना नवी मुंबईतील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एक कर्मचारी हे किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. यातील गंभीर जखमी अभियंता विवेक धुमाळे (35) यांचा मृत्यू झाला आहे.


दरम्यान, उरण येथील जिटीपीएस प्लांटमधील दोन प्लांट सुरू असून यामध्ये सुमारे 180 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येत असून गेल्या दोन दिवसांपासून तिसरा प्लांट सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचदरम्यान, आज सकाळच्या सुमारास अपघात झाल्याने तीन कर्मचारी हे सुमारे 350 अंश सेल्सिअस तापमान असलेले पाणी अंगावर पडल्याने तीन कर्मचारी जखमी झाले होते. तर, एक कर्मचारी हे किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. जीटीपीएस प्लांटमध्ये झालेल्या या स्फोटामुळे सुमारे दीड ते दोन किलोमीटर परिसरात असलेल्या गावांमधील घरांना देखील हादरा बसल्याने गावकरी भयभीत झाल्याचे माजी सरपंच भगवान पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, यातील गंभीर जखमी अभियंता विवेक धुमाळे (35) यांचा मृत्यू झाला आहे. तर, विवेक धुमाळ हे सुमारे 12 वर्षांपासून उरण येथील प्लांटमध्ये काम करीत असून ते एक उत्तम क्रिकेटपटू असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Shivsena : उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रश्न'चिन्ह'; त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे पर्याय आयोगाच्या यादीत नाहीत


Kishori Pednekar : कमळ हेच शिंदे गटाचं चिन्ह, ज्यांनी शिवसेना वाचवायला निघालोय असं सांगितलं, त्यांनीच आईला बाजारात विकलं, किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल