Maharashtra Vidhan Sabha Election रायगड: रायगड जिल्ह्यात सध्या महायुतीची सत्ता आहे. यामध्ये भाजप 3, शिवसेना (शिंदे गट)3 आणि राष्ट्रवादी 1 अशी सात आमदारांची संख्या आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा अशीच जागा वाटपाची स्थिती राहते का ते पाहणे महत्वाचे ठरेल. मंत्री उदय सामंत यांनी येत्या 20 ऑगस्ट पर्यंत महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल अस वक्तव्य केलंय, मात्र महायुतीमध्ये सुरू असलेली अंतर्गत वादाची कारणे सुटली नाहीत तर हा खेळ खेळणे महायुतीला अवघड जाणार आहे. 


रायगड जिल्हयात जास्त ओबीसी समाज असल्याने याचा फायदा घेण्यासाठी बळीराज सेना पक्ष सुधा आगेकूच करताना दिसतंय, तर येणाऱ्या काळात  हा पक्ष इतिहास घडवून पुढील दहा वर्षात एक दिलाने,एक विचाराने काम करून राज्याचा मुख्यमंत्री बसवेल असा आत्मविश्वास  पक्षाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी माणगाव येथील जनसंवाद दौऱ्यात बोलताना व्यक्त केलाय. त्यामुळे विस्कलटलेल्या कुणबी समाजाला एकत्र आणण्याचा डाव बळीराज सेना करताना दिसत आहे.


रायगड जिल्हयात ओबीसी समाज जास्त संख्येनी असल्याने बळीराज सेना पक्षाने सुरुवातीपासूनच कुणबी जोडो अभियान सुरू ठेवलंय. मात्र त्याचा फारसा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर झालेला दिसला नाही.मात्र प्रवाहाच्या विरोधात मतदान करणारा रायगड जिल्हा यंदा कोणाला कौल देणार हे सुध्दा येणारा निवडणुकांचा काळच सांगेल. ओबीसी समाजाला 1990 सालापासून विधानसभा आणि लोकसभेवर नेहमीचं डावलण्यात आले. त्यामुळे नेतृत्व करण्याची मोठी संधी आमच्याकडुन हिरावून घेतली जाते अशी खोचक टीका आणि नाराजगी अशोक वालम यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हयात बळीराज सेनेकडून आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत कोणाला उमेदवारी लढायची असेल तर त्यांनी पक्षाच्या नावाने उभे रहा आपल्याला आपली ताकद कळेल असा सल्ला यावेळी वालम यांनी ओबिसी समाजाला दिलाय यामुळे ओबीसी समाज सुधा पेटून उठला आहे.


एकीकडे सूरु असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसीतून मागत असलेलं आरक्षण वादाच्या भोवऱ्यात आहे, मनोज जारांगे पाटिल आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळे सुरू असलेला ओबीसी विरूद्ध मराठा विषय सुध्दा याला मारक ठरणार असल्याची चर्चा आहे. जिल्हयात पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्याचे पहायला मिळत आहेत. तर शिवसेना भाजप यांच्यातील जिल्ह्यात सुरू असलेला अंतर्गत वाद पाहता महाविकास आघाडी प्रामुख्याने या मतदार संघांवर करडी नजर ठेऊन आहे. त्यामुळे ऐन वेळेला कोणता पक्ष कोणासोबत असेल हे आता सांगणे कठीण आहे. जिल्हयात 60 टक्के ओबीसी समाज आहे मात्र अनेक विधानसभा क्षेत्रात ओबीसी समाजाला अद्याप नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही श्रीवर्धन मतदार संघात तर पूर्वी आणि आताच चित्र पाहता मराठा समाजाने नेतृत्व केलेल पहायला मिळतंय. या मतदार संघात 70 टक्के ओबीसी आहे त्यामुळे स्थानिकांना डावललं जातंय असा आरोप पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी केला आहे.