R D Burman Death Anniversary : सुरांचा बादशाह आर. डी बर्मन (R D Burman) यांची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. हिंदी सिनेसृष्टीला त्यांनी एका पेक्षा एक गाणी दिली आहेत. अनेक दशके आर. डी बर्मन यांनी आपल्या संगीताने चाहत्यांना वेड लावलं आहे. आजही त्यांची गाणी चाहते आवडीने ऐकतात. जाणून घ्या त्यांच्या सुपरहिट गाण्यांबद्दल...
ओ मेरे दिल के चैन (O Mere Dil Ke Chain) :
आर. डी बर्मन यांचं 'ओ मेरे दिल के चैन' हे गाणं अनेकांना आवडतं. आजही हे गाणं रसिकांच्या ओठांवर आहे. हे गाणं राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या 'मेरे जीवन साथी का' या सुपरहिट सिनेमातील आहे.
चुरा लिया है तुमने दिल को (Chura Liya Hai Tumne Jo Dil Ko) :
'यादों की बारात' या सिनेमातील 'चुरा लिया है तुमने जो दिल' हे रोमॅंटिक गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. आजही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. प्रेमात पडलेली मंडळी आजही हे गाणं गुनगुनताना दिसतात.
जिंदगी के सफर में (Zindagi Ke Safar Mein) :
राजेश खन्नाच्या (Rajesh Khanna) 'जिंदगी के सफर में' या सुपरहिट सिनेमातील 'जिंदगी के सफर में' हे गाणं आहे. हा सिनेमा 1974 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला पंचमदांची आठवण येणार नाही असं होणार नाही.
तेरे बिना जिंदगी से (Tere Bina Zindagi Se) :
अभिनेता संजीव कुमारच्या (Sanjeev Kumar) गाजलेल्या 'आंधी' सिनेमातील 'तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नहीं' हे गाणं आहे. हे गाणं आर. डी बर्मन यांचं सर्वात लोकप्रिय गाणं समजलं जातं. या गाण्याचे शब्द मनाला भिडणारे आहेत.
क्या यही प्यार है (Kya Yehi Pyar Hai) :
बॉलिवूड अभिनेता संजय दत्ताच्या 'रॉकी' (Rocky) या सुपरहिट सिनेमातील 'क्या यही प्यार है' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. या गाण्याच्या माध्यमातून अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
संबंधित बातम्या