लोणावळा: लोणावळा शूटिंग पॉईंटवर मद्यधुंद अवस्थेत सेल्फी काढण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला आहे. मंगळवारी सायंकाळी एक तरुण मद्यधुंद अवस्थेत सेल्फी काढण्यासाठी झाडावर चढला. पण, त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो थेट साडेतीनशे फूट खोल दरीत पडला. त्याच्यासोबत असलेल्या पंचम रविदास नावाच्या मित्रानं याची माहिती लोणावळा पोलिसांना दिला.
पंचम मध्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला मित्राचे नाव सांगता आले नाही. पंचमने याची माहिती लोणावळा पोलिसांना देताच, पोलिसांनी शिवदुर्ग टीम सोबत रात्री दहा वाजता युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली.
पाऊस आणि अंधार यामुळे शोध मोहीम मध्यरात्री थांबवून आज सकाळी पुन्हा शोधकार्यास सुरुवात झाली. अखेर १८ तासानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात लोणावळा पोलीस आणि शिवदुर्ग टीमला यश आलं.