Pune Crime News: दुचाकीला कट मराल्याच्या वादातून तरुणाचा खून (murder) केल्याची संतापजनक घटना पुण्यातील (Pune) विश्रांतवाडी परिसराततील वडारवस्ती येथे घडली आहे. या खूना प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक (Arrest) केली आहे. या खूनामुळे विश्रांतवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 


बाळू अर्जुन शिंदे,भैया अँथनी स्वामी , सर्फराज सलीम शेख, अकबर शहाबुद्दीन शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी भीमनगर विश्रांतवाडी येथील रहिवासी आहेत. रस्त्याने जात असताना दुचाकीवरुन कट मारला म्हणून चौघे संतापले. त्यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाटा गेला. दोघांमध्ये धक्काबुक्की झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


तुषार जयवंत भोसले असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी आदित्य भोसले) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.  वाद झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तुषार भोसले याने जनता वसाहत व विश्रांतवाडी येथील मित्रांना बोलावून विश्रांतवाडी येथील वडारवस्तीत भैय्या स्वामीचा शोध सुरू केला. त्यावेळी ते बाळू शिंदे यांच्या घरात घुसले. त्यांनी शिंदे यांना बेदम मारहाण केली. रागाच्या भरात घराजवळ जमलेले शिंदे व सरफराज, अकबर हे हत्यार घेऊन भोसले व त्याच्या मित्रांच्या मागे धावले.


 
तुषार भोसले आणि भैय्या स्वामी यांच्यात यापूर्वी दुचाकी चालवताना कट मारल्यावरुन वाद झाला होता. अनेकदा तो वाद टोकाला गेला. त्यावेळी शिंदे व त्यांचे साथीदार व भोसले व त्यांच्या साथीदारांनी एकमेकांवर दगडफेक केली. शिंदे व त्यांच्या साथीदारांनी भोसले यांना पकडून धक्काबुक्की केली. या हल्ल्यात भोसले गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. विश्रांतवाडी पोलिसांची दोन पथके आरोपीच्या मागावर होती. पोलिसांनी चारही आरोपींना विश्रांतवाडी येथील वडारवाडी व भीमनगर परिसरातून अटक केली.