Pune Monsoon Red Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे  (Pune) जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट परिसरात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रासाठी अत्यंत मुसळधार पावसासह अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement


संपुर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार बॅटींग सुरु केली आहे. मराठवाड्यात तर अनेक गावांमध्ये अतिप्रमाणात पाऊस झाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थितीत मदत आणि बचाव कार्यासाठी खबरदारी म्हणून, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (NDRF) संपूर्ण महाराष्ट्रात 17 पथके तैनात केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाधित जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्यास आणि गरज पडल्यास लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सांगितले आहे.


गेली दोन दिवस पुणे जिल्ह्यात ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे दोन दिवस पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. मात्र आजपासून पुढील तीन दिवस पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात शेतीची लागवड केली होती. या लागवडीला पावसाची गरज होती. त्यामुळे बळीराजादेखील सुखावल्याचं चित्र आहे.


पुणे जिल्ह्यत सह्याद्रीच्या पर्वतरांगा पावसाळ्यात अनेक पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र रेड अलर्ट असल्याने पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवार-रविवार असल्याने अनेक पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतात. त्यांनी खबरदारी घ्यावी, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांचं कोणतंही नुकसान होऊ नये, अपघात होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहे.