पुणे : खंडणीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची विवस्त्र धिंड काढल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आठ युवकांनी खंडणीसाठी एका तरुणांच अपहरण करण्यात आलं. अपहरण करुन पीडीत युवकाला खराडी परिसरात नेऊन मारहाण केली. तसेच त्याला सिगारेटचे चटके देखील देण्यात आले. त्यानंतर पीडीत युवकाची कॅम्प परिसरात रात्री विविस्त्र धिंडही काढण्यात आली.
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी पिडीत तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागचं नेमकं कारण काय आहे? याचा शोध पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संबंधित तरुण या घटनेतून सावरत आहे.
नेमक काय घडलं?
पीडित तरुण हा मूळचा कर्नाटकचा असून काही दिवसांपूर्वी त्याने गाडी दुरुस्तीचा व्यवसाय करत होता. 16 नोव्हेंबरपूर्वी जॅग्वार कंपनीची गाडी दुरुस्तीसाठी आरोपींच्या ओळखीने पीडिताकडे आली होती. त्यामुळे आरोपींनी पीडित तरुणाला दुरुस्तीच्या खर्चापेक्षा पाच लाख रुपये अधिक घ्यायला सांगितले. पण पीडित तरुणाने गाडी मालकाकडून अडीच लाख रुपये घेतले. याच रागातून 16 नोव्हेंबरला आठ तरुणांनी पीडित तरुणाला कोंढवा येथील गॅरेजमधून अपहरण केले आणि हडपसर आणि खराडी परिसरात नेले. नंतर त्याला मारहाण करत नग्नावस्थेत धिंड काढली. पहाटे साडे तीन वाजता पुन्हा त्याला गॅरेजजवळ आणून सोडले.
पुण्यात खंडणीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची विवस्त्र धिंड, पाच आरोपींना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2019 06:24 PM (IST)
खंडणीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची विवस्त्र धिंड, पुण्यातील कॅम्प परिसरातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून पाच आरोपींना अटक
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -