पुणे : रिल कल्चरचा (Pune Reels) तरूणाईला एवढा मोह पडलाय की रिल बनवण्याच्या नादात अनेकांना आपल्या जिवाचीही पर्वा राहात नाही. खरंतर क्रिएटिव्हिटीला वाव देणाऱ्या या रिल कलेला विकृत रूप येऊ लागलंय का असा सवाल आता उपस्थित होत आहे. पिंपरीतील तरूणांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हातात बंदूक नाचवत रील बनवणं तरुणाला भोवलं आहे. हातात बंदूक नाचवत, हवेत गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या गुंडांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ बघून कुणाचाही थरकाप उडेल. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात खुलेआम हातात शस्त्र आणि बंदुका नाचविणाऱ्या गुंडांना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओची तपासणी करून चिखली पोलिस आणि दरोडा विरोधी पथकाने तत्काळ या गाव गुंडाना शोधून त्यांच्या मुसक्या आवळ्या . मात्र पिंपरी चिंचवड शहरात अशा प्रकारे हैदोस या पाच आरोपी पैकी केवळ एक गुंड सध्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कुणाल रमेश साठे असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय , तसेच एक अल्पवयीन आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं आहे, दरम्यान इतर गुंडांचा आपण शोध घेत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
फरार आरोपींचा शोध सुरू
चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील भीमनगर परिसरात ही घटना घडली आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ट्रिपल सीट जाणाऱ्या या तरुणांपैकी एक तरुणाच्या हातात पिस्तुल होती. या व्हायरल व्हिडीओनंतर तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीघांपैकी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. तर इतर दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
तरुणाईचा गुन्हेगारीकडे वाढता कल हा चिंतेचा विषय
दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, कोणीही अवैध प्राणघातक शस्त्रांचा वापर करु नये, असे आढळून आल्यास पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच या प्रकरणी तरूणांनी ही पिस्तूल नक्की का खरेदी केली होती? तसेच कुठून खरेदी केली? यांसह अधिक तपास पोलिसांकडून सध्या केला जात आहे. तरुणाईचा गुन्हेगारीकडे वाढता कल हा चिंतेचा विषय ठरत असून सोशल मीडियाचाही त्यांच्याकडून गैरवापर होत असल्याच या घटनेतून पुन्हा सिद्ध झालं आहे.
हे ही वाचा :