पुणे : वरिष्ठांच्या अश्लील मेसेजला कंटाळून पुण्यातल्या एका विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. डीएचएफएल या फायनान्स कंपनीत क्रेडीट मॅनेजर पदावर काम करणाऱ्या अश्विनी पाटील यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

अश्विनी यांना गेल्या एका महिन्यापासून सुरज बुंदेले हा वरिष्ठ अधिकारी त्रास देत होता. या मानसिक त्रासाला कंटाळून आपण नोकरीचा राजीनामा देणार असल्याचंही तिनं पतीला सांगितलं होतं. अखेर एक महिन्यानं तिच्या मृत्यनंतर हे प्रकरण उघडकीस आलं असून वारजे पोलिसांनी आरोपी बुंदेलेला अटक केली आहे.

8 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महेंद्र कामावरुन घरी आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. त्यांनी बराच वेळ बेल वाजवली तरी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर पत्नीच्या मोबाईलवर अनेकदा फोन केल्यावर दरवाजा उघडला जात नाही म्हणून शेजारच्यांच्या मदतीने त्यांनी धक्का मारुन दरवाजा उघडला.

त्यावेळी बेडरुममध्ये अश्विनी यांनी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले. बुंदेलेनं पाठवलेले अश्लील मेसेजचा मोबाईल अश्विनी यांच्या पतीनं पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.