IAS Pooja Khedkar: वादग्रस्त पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar)प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्याचबरोबर आता या प्रकरणामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase IAS) याचं देखील नावं घेण्यात आलेलं होतं. सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ (Mental Torture) केल्याची तक्रार पूजा खेडकरने केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याची तक्रार पूजा खेडकरने केली. पुजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशीम पोलिसांकडे दाखल केली. त्यानंतर आता ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली आहे. पुणे पोलिस याच्या कायदेशीर बाबी तपासताय असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिस सर्व गोष्टी तपासून पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला अहवाल दिल्यानंतर या प्रकरण आलं होतं समोर
सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरच्या विरोधात राज्य सरकारला अहवाल दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यानंतर आता पूजा खेडकरची कार्मिक मंत्रालयाच्या समितीकडून चौकशी केली जात आहे. पूजा खेडकरांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपवण्यात आला असून तिला मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आलं आहे.
पुजा खेडकरने काल(मंगळवारी) पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशीम पोलिसांकडे दाखल केली. त्यानंतर खळबळ उडाली. वाशीम पोलिसांकडे दाखल केलेली ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली आहे. पुणे पोलिस या संदर्भातील कायदेशीर बाबी तपासत असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिस सर्व गोष्टी तपासून पुढचा निर्णय घेणार आहेत.
पुणे कलेक्टरांनी छळवणूक केल्याचा पूजा खेडकरचा आरोप
पूजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी आणि इतर काही अधिकाऱ्या विरोधात छळवणूक केल्याची तक्रार केली आहे. खेडकरने केलेली ही तक्रार सामान्य विभागाकडे वर्ग करण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी त्यावर कारवाई करतील अशी माहिती समोर आली आहे.
पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असून पुण्यामध्ये प्रशिक्षण घेत असताना ती तिच्या मागण्यांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. तिने केलेल्या अवास्तव मागण्यांनंतर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तिची तक्रार राज्य शासनाकडे केली. त्यानंतर पूजा खेडकरची बदली वाशिममध्ये करण्यात आली.
पुण्यामध्ये असताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे चेंबर बळकावल्याचा आणि खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून फिरल्याचा आरोप पूजावर करण्यात आला. तसेच एक प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना पूजा खेडकरने कार्यालय, शिपाई अशा अवास्तव मागण्या केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
संबधित बातम्या: मोठी बातमी! पुण्याच्या कलेक्टरांनी मानसिक छळ केल्याचा पूजा खेडकरांचा आरोप, तक्रार दाखल