चारित्र्याच्या संशयावरुन पुण्यात पत्नीची हत्या, पतीला अटक
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 07 Nov 2016 11:45 AM (IST)
शिरुर: पुण्यातील शिरुरमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. शिरुर मधील रामलिंग येथे राहणाऱ्या सीताराम घावटे यांने पत्नी रुपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा साडीने गळा आवळून खून केला. हत्येनंतर त्यानं पत्नी रुपालीचा मृतदेह १० किमी दूर एका शेतात टाकून दिला. रुपालीचा मृतदेह शेतात आढळून आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली. दरम्यान, चौकशीअंती रुपालीचा पती आरोपी सीताराम घावटे याला अटक करुन त्याच्यावर कलम- ३०२,२०१ अंर्तगत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.