पुण्यातील SRPF मैदानावर सरावादरम्यान पोलिसाचा मृत्यू
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 07 Nov 2016 11:02 AM (IST)
पुणे : पुण्याच्या हडपसर इथल्या एसआरपीएफ मैदानावर आज एका पोलिस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राम नागरे असं मृत पोलिसाचं नाव आहे. पोलिस खात्याअंतर्गत होणाऱ्या उपनिरीक्षक पदासाठी सरावादरम्यान राम नागरे मैदानावरच कोसळले. त्यांना जवळच्या नोबेल रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगिलं. कॉन्स्टेबल राम नागरे सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. पोलिस खात्यातंगर्त पोलिस उपनिरीक्षकपदाच्या लेखी परीक्षेत राम नागरे यांना 218 गुण मिळाले होते. तर येत्या 21 नोव्हेंबर रोजी शारीरिक परीक्षा होणार आहे. शारीरिक परीक्षेच्या सरावासाठी राम नागरे हडपसरच्या एसआरपीएफ मैदानावर दाखल झाले होते. मात्र हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.