दिवंगत शरद जोशींचा अर्थविचार राजकारणाला कलाटणी देणारा : गडकरी
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2016 05:10 PM (IST)
पुणे : शेतकरी कमागार नेते दिवंगत शरद जोशी यांना राजकारणात लौकिक अर्थाने यश मिळालं नाही. मात्र, त्यांनी मांडलेला अर्थविचार हा संपूर्ण राजकारणाला कलाटणी देणारा होता, असे मत केंद्रीय दळववळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते पुण्यात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. शरद जोशी यांच्यावरील 'शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा' या पुस्तकाचं पुण्यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. या पुस्तकात लेखिका वसुंधरा काशीकर-भागवत यांनी शरद जोशी यांच्या झंझावती आणि वादळी जीवनाचा आढावा घेतला आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शरद जोशींसोबत काम केलेल्या माजी आमदार सरोज काशीकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अर्थविषयांचे अभ्यासक राजीव साने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.