पुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली? लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी? यावरुन यावर्षीही नव्याने वाद उभा राहण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर नव्याने माहिती अपडेट करण्यात आली आहे.


यावरून मागच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवात मोठा वाद उफाळला होता. भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असं म्हणत भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते. यावर्षीचा गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधी पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर रंगारी यांनी सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली हे नमूद केलं आहे.



रंगारी यांनी पुण्यात 1892 साली सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, असं वेबसाईटवर म्हटलं आहे. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक कोण? या वादावर पडदा पडतो की नवा वाद सुरु होतो याकडे लक्ष लागलं आहे.



दरम्यान, याविषयी महापौर मुक्ता टिळक यांना विचारलं असता वेबसाईटवर हा बदल कसा झाला याची आपल्याला कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?


गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले


गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोत टिळकांचा फोटो नाही