पुणे: पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुण्यात आहेत. पुण्यातील साखर संकुल येथे काही सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलही यांच्यासोबत अजित पवारांची (Ajit Pawar) बैठक पार पडली. साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाचे कामकाजाचा अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (गुरूवारी) आढावा घेतला आहे. दरम्यान या बैठकीसाठी अजित पवार (Ajit Pawar) कार्यालयात पोहोचताच कार्यालयातली वीज गेली आणि तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी अचानक धावपळ सुरू झाली.
अजित पवार साखर संकुल कार्यालयात येताच काही सेकंद वीज गायब
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील साखर संकुल येथे साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेणाऱ्या बैठकीला उपस्थिती दर्शवली. अजित पवार (Ajit Pawar) साखर संकुल कार्यालयात येताच काही सेकंद वीज गायब झाली. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची पळापळ झाली. त्या अगोदर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन केले. तर आणखी एका कार्यकर्त्याने घेतलेल्या नव्या गाडीचे पूजन देखील यावेळी अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले.
बाबा आढाव यांनी उपोषण कधी सोडलं?
यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) बाबा आढाव यांनी उपोषण कधी सोडलं? असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला, त्यावेळी एक कार्यकर्ता म्हणाला उद्धव ठाकरे आल्यानंतर बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं. त्यावर अजितदादांच्या देहबोलीतून नाराजी व्यक्त झाल्याचं दिसून आले. तसेच यावेळी कार्यकर्त्यांना बोलताना, मला काम करू द्या. सकाळ सकाळ हे काय आल्या आल्या कामच करून देत नाही असंही ते कार्यकर्त्यांना म्हणाले.
शरद पवार आणि अजित पवार बारामतीत येणार एकाच मंचावरती?
शरद पवार आणि अजित पवार बारामतीत येणार एकाच मंचावरती येणार असल्याची चर्चा आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावरती माहिती पोस्ट केली आहे.बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषीक कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दोघं एकाच मंचावर येणार आहेत. नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवार बारामतीत पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने दरवर्षी कृषी प्रदर्शनाचा आयोजन केलं जातं. शरद पवार या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. 16 ते 20 जानेवारी दरम्यान बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला दोघे एकाच मंचावर उपस्थित असणार आहेत.