पुणेकरांना खुशखबर, सोमवारपासून पाणीकपात रद्द
एबीपी माझा वेब टीम | 16 Jul 2016 02:17 PM (IST)
पुणे : पाणीकपातीमुळे वैतागलेल्या पुणेकरांसाठी एक खुषखबर आहे. येत्या सोमवारपासून पुण्यातील पाणीकपात रद्द करण्यात आलीय. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतलाय. चारही धरणांमध्ये 15 टीएमसी पाणीसाठा आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. उन्हाळ्यात धरणांनी तळ गाठल्यामुळे पुण्यात एकदिवसाआड पाणीपुरवठा होत होता. मात्र वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे पुणेकरांवरचं पाणीकपातीचं संकट टळलंय.