त्यानंतर आता पुण्यातील कोंढवा परिसरातून एटीएसने पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. पुणे एटीएसची कौसरबाग परिसरात ही कारवाई केली.
दरम्यान, दोन दिवसापूर्वी परभणीतील गाडीवान मोहल्ल्यातून नासीरबीन अबूबकर याफई उर्फ चाऊस या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती.
VIDEO: पाहा नासिरबिनच्या भावाची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
कोण आहे नासीरबीन?
नासीरबीन हा दहशतवादी संघटना आयसिसच्या संपर्कात होता असा एटीएसचा आरोप आहे. रमजानच्या महिन्यात त्यानं मोठा घातपात घडवण्याचा कट आखला होता, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. नासीरबीनवर लावेलेले सर्व आरोप त्याच्या कुटुंबीयानं फेटाळले आहेत.