पुणे : सायबर फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार पुण्यात (Pune Crime News) समोर आला आहे. सोशल मीडियावर “प्रेग्नंट जॉब” नावाच्या जाहिरातीच्या माध्यमातून शहरातील एका कंत्राटदाराला तब्बल ११ लाख रुपयांचा फसवणुकीचा (Pune Crime News) फटका बसला आहे. या जाहिरातीत “एका महिलेला गर्भवती केल्यास २५ लाख रुपये दिले जातील” असा दावा करण्यात आला होता. या आमिषाला बळी पडून कंत्राटदाराने रक्कम भरल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. सध्या बाणेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तपास सुरू आहे.(Pune Crime News) 

Continues below advertisement

Pune Crime News: ‘प्रेग्नंट जॉब’ जाहिरातीचा व्हिडिओ व्हायरल

बाणेर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंत्राटदाराच्या मोबाईलवर “प्रेग्नंट जॉब” या शीर्षकाचा व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये एक महिला म्हणताना दिसत होती “मी अशी व्यक्ती शोधत आहे जी मला आई बनवेल. त्याचा रंग, शिक्षण, जात मला महत्त्वाचं नाही.” व्हिडिओतील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर कंत्राटदाराशी एका व्यक्तीने बोलून स्वतःला ‘प्रेग्नंट जॉब फर्म’चा सहाय्यक असल्याचं सांगितलं. त्याने कंत्राटदाराला सांगितलं की, “महिलेसोबत राहण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ओळखपत्र तयार करावं लागेल.”

Pune Crime News: विविध कारणांखाली वसूल केले ११ लाख रुपये

त्यानंतर काही दिवस कंत्राटदाराला रजिस्ट्रेशन फी, आयडी कार्ड, व्हेरिफिकेशन, जीएसटी अशा विविध कारणांखाली पैसे मागण्यात आले. तपासातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते २३ ऑक्टोबरपर्यंत कंत्राटदाराकडून वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये एकूण ११ लाख रुपये ट्रान्सफर करून घेण्यात आले. या काळात ठगांनी त्याला कधी खोट्या आश्वासनांनी, तर कधी धमक्यांनी गप्प ठेवले. शेवटी जेव्हा कंत्राटदाराने त्यांच्या मागण्यांबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी त्याला ब्लॉक केलं. तेव्हाच त्याला फसवणुक झाल्याचं समजलं आणि त्याने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Continues below advertisement

Pune Crime News: देशभरात अशा फसवणुकीचे वाढते प्रकार

सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, २०२२ च्या अखेरपासून देशभरात “प्रेग्नंट जॉब सर्व्हिस” किंवा तत्सम नावाने अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. या स्कीम्समध्ये पुरुषांना “महिलांना गर्भवती केल्यास लाखो रुपये मिळतील” असा लालच दाखवला जातो. फसवणूक करणारे प्रथम रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली पैसे घेतात, त्यानंतर मेडिकल टेस्ट, कायदेशीर प्रक्रिया, सिक्युरिटी डिपॉझिट इत्यादी कारणांखाली अधिक रक्कम मागतात. पैसे मिळाल्यानंतर हे ठग गायब होतात.

अशा प्रकारचे प्रकरणे बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्येही नोंदवली गेली असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासातून हे स्पष्ट झाले आहे की, हे सर्व प्रकार मोठ्या सायबर गुन्हेगारी जाळ्याचा भाग आहेत, जे सोशल मीडियावर खोटे व्हिडिओ आणि बनावट जाहिराती वापरून लोकांना जाळ्यात ओढतात.