पुणे : प्रसिद्ध उद्योगपती विठ्ठल कामत यांच्या ऑर्किड हॉटेलवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील हॉटेलवर उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील बालेवाडी परीसरात असलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षांपासून ऑर्किड हॉटेलनं 12 कोटींचा कर थकवल्यानं उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली.

प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक म्हणून विठ्ठल कामत यांचं नाव घेतलं जातं. मुंबईतही विठ्ठल कामत यांचं ऑर्किड हॉटेल आहे. तसंच जागतिक पातळीवर ऑर्किड हॉटेलनं अनेक पारितोषिकांवरही आपलं नाव कोरलं आहे.