पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. वाराणसी एक्स्प्रेस नियोजित वेळेच्या 22 तासांनंतरही न आल्याने पुणे रेल्वे स्टेशनवर जवळपास 800 प्रवासी खोळंबले आहेत.
वाराणसी एक्स्प्रेस दहा तास उशिराने असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात 22 तासांनंतरही रेल्वे न आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.
आता 22 तासांनंतर एक्स्प्रेस रेल्वे पुणे स्टेशनमध्ये दाखल झाली. मात्र, साफसफाईसाठी गेल्याने आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांमध्येही संतापाचं वातावरण आहे. छटपूजेसाठी वाराणसीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
गुरुवारी सकाळी 10.45 वाजता एक्स्प्रेस वाराणसीकडे रवाना होणं अपेक्षित होतं. मात्र, आता रेल्वे प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, साफसफाईन करुन पाणी भरल्यानंतर दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी एक्स्प्रेस रवाना होईल.