पुणे : कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडलं. यात दोन इंजिनिअरचा निष्पाप जीव गेला. त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील ब्रम्हा कॉर्पच्या विशाल अग्रवाल यांच्या सतरा वर्षीय मुलाने दोघांना चिरडलं. याप्रकरणी पोलिसांनी अग्रवालवर गुन्हा दाखल केला आणि त्यानंतप पळून गेलेल्या अग्रवालला संभाजी नगरमधून अटक केली. या प्रकरणावरुन आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay waddetiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली?रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली? नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? , असे अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहे. वडेट्टीवारांनी ट्विट करुन हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
विजय वडेट्टीवारांनी ट्विटमध्ये काय लिहिलंय?
विजय वडेट्टीवारांनी ट्विटमध्ये काय लिहिलंय की, दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी. पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी.पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पित असल्याचे CCTV फुटेज असून ही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली?रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली?नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही?या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे. आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? म्हणूनच सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे.
फरार बिल्डर विशाल अग्रवालला अटक!
कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजी नगरमधून बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलीस क्राईम ब्रांच आणि छत्रपती संभाजी नजर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत विशाल अग्रवाल, ड्रायव्हर आणि एकाला अटकर करण्यात आली आहे. पहाटेच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
इतर महत्वाची बातमी-