Vishal Agrawal Pune Car Accident : पुणे पोर्शे कार अपघाताची धक्कादायक माहिती उघड, RTO पोलीस काय म्हणाले..

पुणे: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती. अखेर पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. विशाल अग्रवाल यांना आता दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. विशाल अग्रवाल यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी न्यायालय काय निकाल सुनावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यावर आता आरटीओ पोलिसांनी मोठा खुलासा केला.पाहा व्हिडिओ..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola