पुणे : अहमदनगर-कल्याण महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या तीन वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडलं. यात अपघातात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील उदापूर इथे आज पहाटे साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली.


मृतांमध्ये जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्या आईचा समावेश आहे. मीराबाई ढमाले असं त्यांच्या आईचं नाव आहे. तर त्यांच्याच कुटुंबातील कमलाबाई ढमाले आणि सगुणाबाई गायकर अशी इतर दोन महिला या अपघातात मृत पावल्या.

CCTV | लोकल पकडताना फरपटत गेला, पण प्रवासी, आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे जीव बचावला | ABP Majha



या तिन्ही वृद्ध महिला नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. मात्र आज त्यांच्यावर काळाने घाला घातला. हॉटेल कुकडू कुक समोर आल्या. तेव्हा अज्ञात अवजड वाहनाने काही कळायच्या आत त्यांना चिरडलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वाहन चालक फरार झाला असून ओतूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यासाठी ग्रामपंचायतीचे आणि आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेजही तपासलं जात आहे.

VIDEO | ... आणि क्षणात कारचे दोन तुकडे झाले | नवी दिल्ली | एबीपी माझा