Prakash Ambedkar on Modi and Shah : 2024 मध्ये गैरभाजप आणि आरएसएसचं सरकार सत्तेत आलं तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. झुकानेवाला चाहिये, सरकार उसके सामने झुकती है... 2024 मध्ये यांना झुकावं लागेल, हेच आव्हान मी देतोय, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 
 
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना उत्तराधिकाऱ्यावरुन सवाल केला. ते म्हणाले की, 'नरेंद्र मोदी यांना सवाल आहे. मोदी नंतर दुसरा पंतप्रधान कोण? एकही माणूस आपल्या नजरेसमोर नाही, या देशाचे नेतृत्व करू शकतो असे कुणी दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, दक्षिणेतील, उत्तरमधील राज्यात पण हीच परिस्थिती आहे. एकही व्यक्ती राहिली नाही की तो त्याच्या राज्याच्या बाहेर जाऊन नेतृत्व करू शकतो, असेही आंबेडकर म्हणाले.  


संभाजी राजे माझ्याकडे येऊन गेले.  त्यांना मी म्हटलं की, आपल्याला नवीन काही करायचे असेल तर जुनं पाणी बदलून नवीन पाणी देऊन महाराष्ट् गतिमान करता येईल. विकासाच्या संदर्भात पण तेच आहे. आज शहरीकरण वाढत आहे. त्याच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येक शहर मुंबई नाही की चारही बाजूने पाणी आहे. उरलेली शहरं धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शहर आणि ग्रामीण यांच्यामध्ये पाण्यावरून वाद आता नव्याने दिसतो आहे. संभाजी राजेंना मी सांगितले की हा वाद थांबवावा लागेल. नवीन धोरण आखावे लागेल, असे आंबेडकर म्हणाले.  


जवाहरलाल नेहरू म्हणाले होते हा कृषीप्रधान देश आहे. या देशाला आर्थिक स्थैर्य हवं असेल तर उद्योगांची गरज आहे. त्यामुळे पाहिले पाच वर्ष जड उद्योग निर्माण करायला लागले. जुन्या मंडळींना घेऊन डाव खेळायला गेलो तर पुन्हा उपासमारी आणि पुन्हा देशात आंदोलन, धर्म आणि त्यातला भेद होईल. सत्ता टिकवण्यासाठी भाजपने एक गोष्ट सुधारली आहे असं सांगावं. त्यांचे हिंदुत्व इथल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्याबद्दल बोलणं होय असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.


ग्रेस, राष्ट्रवादी दक्षिणेतील, उत्तरमधील राज्यात पण ही परिस्थितीत आहे. एक ही व्यक्ती राहिली नाही की तो त्याच्या राज्याच्या बाहेर जाऊन नेतृत्व करू शकतो. ED, सीबीआय, आयबीचा धाक आहे म्हणून सगळे लोकं मुजरा करतात, हात जोडतात. त्यासारख्या दुसरा माणूस नाही. पण मनातल्या मनात हे कधी जातात हे असं चाललं आहे. भाजपवाले म्हणतात की आम्ही 2024 मध्ये परत येऊ.. मी म्हणतो 29 मध्ये याल. कारण आम्हा सगळ्यांना आत टाकलं जाईल. मग विरोध करणार कोण? तुम्ही त्यांना दोनदा पंतप्रधान केलं. मोदी यांच्या मनामध्ये भीती आहे की 2024 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीचे माहितीपट दाखवणाऱ्यांना अटक केली जात आहे. मोदी यांना भीती आहे की आपली सत्ता जाईल. म्हणून ती फिल्म बॅन केली, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


देशाचे विभाजन कॉर्पोरेटमध्ये केले जाईल. लोकांचा पैसा आता या भांडवलदारांकडे वळवला जातो. किती जणांना माहिती आहे की भारताचे सोने गहाण ठेवले गेले. 35000 टन सोनं बँक ऑफ इंग्लंड मध्ये ठेवले होते. मी विचारले तेव्हा पुढे बघू असे सांगितले गेले. नरेंद्र मोदी यांचा नवीन फंडा आहे की देश चालवण्यासाठी जेवढा निधी पाहिजे तेवढा जमत नाही. मग कारखाने विकून देश चालवला जात आहे. मोदी यांना एका बाजूला बसवा आणि मी एका बाजूला बसतो आणि मी त्यांना चार प्रश्न विचारतो आणि त्यांनी उत्तर द्यावे. एकतर मोदी पाहिजे किंवा मोहन भागवत पाहिजे बाकी कोणी नको... , असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.