Vande Bharat Train: मुंबई-पुणे (mumbai-pune) प्रवास करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला लवकरच वंदे भारत (Vande Bharat Train) ही ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे प्रवास फक्त अडीच तासात पुर्ण होणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत या ट्रेनच्या फेऱ्या सुरु होण्याची शक्यता आहे.
डेक्कन एक्सप्रेसच्या (Deccan Express) माध्यमातून मुंबई-पुणे प्रवास हा साधारण तीन ते चार तासांत पुर्ण व्हायचा. सगळ्या कमी वेळ लावणारी डेक्कन एक्सप्रेस ही पहिली ट्रेन होती. आता मात्र महाराष्ट्राला पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. या ट्रेन मार्फत मुंबई-पुणे प्रवास आता फक्त अडीच तासात पुर्ण होणार आहे. ही ट्रेन AC आणि सीटींग असणार आहे.
वंदे भारतची निर्मिती का केली?
वंदे भारत या ट्रेनची निर्मीतीच वेगवान प्रवास होण्यासाठी करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार असल्याने ही ट्रेन अनेकांना उपयुक्त ठरणार आहे. काही मुख्य शहर जोडण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली होती. येत्या दोन वर्षात 400 वंदे भारत ट्रेन चालवण्यात येणार आहे.
वाराणसी- नवी दिल्ली, वैष्णोदेवी-नवी दिल्ली या ट्रेन सध्या सुरु करण्यात आल्या आहेत. 15 ऑगस्टपर्यंत दोन नवीन गाड्या सुरु होऊ शकतात, अशी माहिती आहे. त्यात मुंबई-पुणे ही ट्रेन देखील सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप रेल्वे बोर्डाकडून याबाबत परवानगी देण्यात आली नाही आहे, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
नाश्ता आणि जेवणाची सोय उपलब्ध
वंदे भारत गाड्यांमध्ये GPS-आधारित प्रवासी माहिती,सीसीटीव्ही कॅमेरे,स्वयंचलित दरवाजे आणि व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट यांसारख्या सुविधा आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सहज बाहेर काढण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चार आपत्कालीन खिडक्या बसवण्यात आल्या आहेत.ट्रेनमध्ये जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. तिकीटाच्या किमतीतच त्याच्या किमती समाविष्ट केल्या जातात. जर तुम्ही वाराणसी ते दिल्ली असा प्रवास केलात तर तुम्हाला नाश्ता आणि जेवण ट्रेनमध्येच देण्यात येतं.