पुणे: पुण्यातील बनावट टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बेकायदा टेलिफोन एक्सचेंज चालविणारा संशयीत वर्षभरापासून कोंढव्यात वास्तव्यास होता अशी माहिती समोर आली आहे. चीन, पाकिस्तान आणि आखाती देशांतून येणारे फोन स्थानिक नंबरवर पाठवून टेलिफोन एक्स्चेंज चालविणारा संशयित वर्षभरापासून कोंढव्यात वास्तव्यास होता अशी माहिती समोर आली आहे. नौशाद सिद्दीकी असे संशयिताचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील आहे. कोंढव्यात सुरू असलेले बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटर एटीएसने उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत (Pune Crime News) तीन हजार 788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, नऊ वायफाय राऊटर्स, अँटेना आणि काही लॅपटॉप जप्त केले आहेत.


पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद वस्तू आणि सामान जप्त (Pune Crime News) करण्यात आले होते. या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड सात सिम बॉक्स वाय फाय आणि सिम्बॉक्स चालविण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना लॅपटॉप सह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे. 


कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर 


विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होतं. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्ष तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोंढव्यातील मिठा नगर येथे असलेल्या एम.ए.कॉम्प्लेक्स परिसरात अधिकृत एक्सचेंज सेंटर सुरू होतं. 


दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा दहशत विरोधी पथक सध्या तपास करत असून ताब्यात घेण्यात आलेल्या नौशादकडे पोलीस चौकशी (Pune Crime News) सुरू होती.