पुणे : “समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी सत्ताधाऱ्यांचं लांगूलचालन केलं असतं, तर ते आज राज्यपाल झाले असते. पण त्यांनी आपल्या विचारांशी प्रतारणा कधीच केली नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सप्तर्षी यांचा गौरव केला. सप्तर्षी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या जीवनगौरव समारंभात उद्धव ठाकरे बोलत होते.

 

या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराथी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर,खासदार हुसेन दलवाई उपस्थित होते.

 

दरम्यान, सध्या समाजा-समाजामध्ये संघर्ष निर्माण होत असून, ज्या व्यवस्थेमुळे देश पारतंत्र्यात राहिला, तोच विचार परत येत असल्याची खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवली.