पुणे : पुण्यासह राज्यभरात ‘जीबीएस’ ची वाढणारी रुग्‍णसंख्‍या कमी असल्याचे दिसून येत असले तरी मृत्‍यूची संख्‍या काही अंशी वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्‍या दोन दिवसांमध्ये दौंड येथील 37 वर्षीय तरुण व सिंहगड रस्‍त्‍यावरील नांदेड सिटी येथे राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणी या दोघांचा ‘जीबीएस’ चे उपचार घेत असताना मृत्‍यू झाला आहे. आतापर्यंत एकूण मृतांची संख्‍या 11 झाली आहे. आतापर्यंत पुण्‍यात ‘जीबीएस’ च्‍या रुग्‍णांची संख्‍या 211 वर पोहोचली आहे. दौंड तालुक्‍यातील सोनवडी येथील 37 वर्षीय तरुणाला हातांमध्‍ये अशक्‍तपणा जाणवू लागले आहे, 10 फेब्रुवारीला उपचारासाठी ससून रुग्‍णालयात भरती केले होते. त्‍याला 11 ते 13 फेब्रुवारी दरम्‍यान ‘आयव्‍हीआयजी’ हे औषधांचे डोस दिले. तसेच त्‍याचवेळी त्‍याला ‘जीबीएस’ चे निदान करण्‍यात आले. त्‍याला व्‍हेंटिलेटर लावला होता. त्‍याला अर्धांगवायू झाला होता व मानही धरता येत नव्‍हती. त्‍याच्‍या फुप्‍फुसालाही संसर्ग झाला होता. उपचारादरम्यान त्‍याचा 17 फेब्रुवारीला पहाटे मृत्‍यू झाला.

 नांदेड सिटी येथील 26 वर्षीय तरुणीला 15 जानेवारीला 3 ते 4 वेळा जुलाबाचा त्रास झाला होता. कोणतेही औषधोपचार न घेता तो त्रास बंद झाला. त्‍यानंतर 22 जानेवारीला तिला गिळण्‍यास, चहा पिण्‍यास त्रास होऊ लागला. काही दिवसांमध्येच हा त्रास वाढून हाताला अशक्‍तपणा येऊ लागला. सायंकाळपर्यंत तर तिच्‍या दोन्‍ही पायांतील शक्‍ती गेली. उपचारासाठी आधी तिला सह्याद्री रुग्‍णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर तेथून तिला 25 तारखेला नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले रुग्‍णालयात दाखल केले. तेथे तिला व्हेंटिलेटर लावले आहे. परंतु, तिचा उपचारादरम्‍यान 18 तारखेला मृत्‍यू झाला. जीबीएससह विविध अवयव निकामी होणे, रक्तदाब सामान्यपेक्षा खूपच कमी होणे अशी मृत्‍यूचे कारण आहे.     

‘जीबीएस’ ने आतापर्यंत झालेले मृत्‍यू 

   रुग्‍ण व वय – पत्‍ता – मृत्‍यू दिनांक  1. पुरुष, 40 –  डीएसके, धायरी –  25 जानेवारी2. स्‍त्री, 56 –   नांदोशी, किरकटवाडी – 28 जानेवारी 3. पुरुष, 36 –  पिंपळे गुरव –  30 जानेवारी 4. पुरुष, 60 – धायरी    – 31 जानेवारी5. पुरुष, 60 – वारजे माळवाडी – 31 जानेवारी6. पुरुष, 63 – वडारवस्‍ती, कर्वे नगर – 5 फेब्रुवारी 7. पुरुष, 37 – अप्‍पर इंदिरानगर – 9 फेब्रुवारी8. पुरुष, 59 – खडकवासला – 11 फेब्रुवारी9. पुरुष, 34 ,– वाघोली  – 15 फेब्रुवारी10. पुरुष, 37 – दौंड –   17 फेब्रुवारी11. स्‍त्री, 26 – नांदेड सिटी – 18 फेब्रुवारी

काय काळजी घ्यावी

पाणी उकळून व गाळून प्यावे.उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

अतिसारपोटदुखीतापमळमळ किंवा उलट्या

GBS हा आजार नेमका काय?

आतापर्यंत राज्यात किरणसह इतर 10 जणांचा GBS मुळे मृत्यू झाला आहे. GBS गुलेन बॅरे सिंड्रोम हा ऑटोइम्यून डिसऑर्डर, आजार आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकार शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नानूंमध्ये कमकुवतपणा येतो. तसंच गंभीर आजारात अर्धांगवायू देखील होतात.