Pune Pawana Dam News: मुंबईतील (Mumbai) 13 वर्षीय शाळकरी मुलगी आणि एका व्यक्तीचा पवना धरणात (Pawana dam) बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात उतरलेल्या सात जणांपैकी  दोघांचा बुडून मृत्यू (death) झाला. आर्या जैन आणि समीर सक्सेना अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. एक संपुर्ण कुटुंब आणि काही मित्र फिरायला आले असता ही घटना घडली. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. त्यातील पाच जणांना प्राण वाचवण्यासाठी बचाव पथकाला आणि पोलिसांना यश आलं. 


आर्य दीपक जैन (वय 13), समीर कुलदीप सक्सेना (वय 43), पायल समीर सक्सेना (वय 42), लक्ष्य सक्सेना (वय 14), यश सक्सेना (वय 8), आदि चुगानी (वय 14) अशी मृतांची नावे आहेत. आणि अंश सुरी (वय 14). सक्सेना कुटुंब मुंबईतील प्रभादेवी परिसरातील रहिवासी आहे. या घटनेमुळे सगळ्या कुटुंबीयांमध्ये आणि मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे.


सक्सेना कुटुंबीय आणि त्यांच्या मुलांचे मित्र पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. फांगणे गावाजवळील धरणाच्या पाण्यात पर्यटक शिरले. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे सर्वजण बुडाले होते. वेळीच सगळ्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारच्या पर्यटकांनी मदतीचा हात दिला आणि बचाव पथकाला बोलवलं. पवनानगर चौकीचे पोलीस हवालदार रफीक शेख आणि विजय गाढे यांना सात जण बुडाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. सर्व सदस्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. आर्या जैन आणि समीर सक्सेना यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.


नागरीकांच्या अति उत्साहाने अपघात
पुण्याच्या आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य अनुभवायला अनेक नागरीक गर्दी करतात. अनेक नागरीकांना फोटो आणि सेल्फीचा मोह आवरत नाही. अति उत्साह दाखवतात. यामुळे गडकिल्ले आणि धोकादायक ठिकाणांवरील अपघातांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. अनेक लहान मोठ्या धबधब्यामध्ये आतपर्यंत अनेकजण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे. त्याचबरोबर अनेकांनी जीव गमावला आहे. तरी देखील नागरीक खबरदारी घेताना दिसत नाही. धोकादायक ठिकाणी किंवा गडकिल्ल्यांवर जाताना योग्य काळजी घ्या. खबरदारी बाळगा, असं आवाहन प्रशासनाकडून कायम केलं जातं. त्याच्याकडून योग्य योजनादेखील आखली जाते मात्र नागरीकांच्या हलगर्जीपणामुळे अपघाताचं सत्र सुरुच असल्याचं चित्र आहे.