पुणे : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ससुन जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना काळे फासण्याचा इशारा त्रुप्ती देसाईंनी एका आंदोलनादरम्यान दिला होता. त्यानंतर त्रुप्ती देसाई यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी कात्रजमधील घरातून त्यांना ताब्यात घेतलंय.


तृप्ती देसाई यांनी ससुन जिल्हा रुग्णालयातील डॉ. अजय चंदनवाले यांना काळे फासण्याची धमकी दिली होती. डॉ. अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी तृप्ती देसाई पत्रकार परिषद घेऊन केली होती.

यापूर्वीही तृप्ती देसाईंनी असे इशारे दिले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरांनासुद्धा काळं फासण्याचा असाच इशारा देसाईंनी दिला होता.