रायगड : पुणे एक्स्प्रेस मार्गावर आज (गुरुवार) सकाळी भीषण अपघात झाला. एक्सप्रेस वेवर खोपोलीनजीक भरधाव टेम्पोने रस्त्यावर काम करणाऱ्या सहा कामगारांना चिरडले. या अपघतात एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच कामगार जखमी झाले आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. आज सकाळच्या सुमारास सहा कामगार रस्त्याच्या लॅनिंगचे थर्मोप्लास्टचे काम करत होते. त्याचवेळी पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव टेम्पोने या सहा कामगारांना चिरडले आहे. या अपघातावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने दुसऱ्या टेम्पोलाही धडक दिली.
यामुळे, या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना नवीमुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, टेम्पोने सहा कामगारांना चिरडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2018 12:48 PM (IST)
आज सकाळच्या सुमारास सहा कामगार रस्त्याच्या लॅनिंगचे थर्मोप्लास्टचे काम करत होते. त्याचवेळी पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव टेम्पोने या सहा कामगारांना चिरडले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -