पुणे: सलग सुट्ट्यांमुळे पुणे- मुंबई द्रूतगती मार्गावर आज पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे.  धूळवड, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण पाहायला मिळत आहे.


मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहनं ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं चित्र नेहमीच पाहायला मिळतं.  मात्र यावेळी पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांमुळेही वाहतूक कोंडी झाली.

गुरुवारी रात्री अकरापासून दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र आज सकाळी मुंबईकडे येणारा मार्ग मोकळा झाला. पण पुण्याकडे जाणारी वाहतूक संथगतीने सुरु आहे.

अनेकांनी गुरुवारचं कार्यालयीन कामकाज आटोपून, संध्याकाळी प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर वाहनांची तुफान गर्दी दिसत होती. ती गर्दी आजही कायम आहे.