Pune-Indapur Crime:  16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील एका गावात घडली आहे. पीडितेला बळजबरीने मक्याच्या शेतात ओढून नेत नराधमांनी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेसंदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी राहुल हनुमंत जाधव या मुख्य आरोपीस वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर दोघे अद्याप फरार आहेत.


नक्की काय घडलं?
शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत राहुल हनुमंत जाधव याने पीडितेला शेतात जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने ओमनी या चारचाकीमधून आलेल्या त्याच्या दोघा साथीदारांपैकी एकाने पीडितेवर जबरदस्ती केली. या दोघांनीही चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. त्यानंतर आरोपींनी पिडीतेस ओमनी गाडीतून इंदापूर बारामती रोडवर असलेल्या एका घरात घेऊन गेले. थोड्यावेळाने त्याच गाडीतून आरोपींनी तिला बेलवाडी बस स्थानकावर सोडले. या तिघा नराधमांपैकी मुख्य आरोपी असलेल्या राहुल हनुमंत जाधव याला वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.


इंदापूर तालुक्यात अल्पवयील मुलींवर होणारे अत्याचार सातत्याने वाढत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. महिलेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रशासनाचं लक्ष कुठे आहे, नराधमांना शिक्षा होत नाही त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्यानं नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.


अल्पवयीन मुलीवर एका लॉजमध्ये अत्याचार


एका अल्पवयीन मुलीवर एका लॉजमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. पुण्यातील  तळेगाव दाभाडे येथे हा प्रकर घडला होता. याप्रकरणी पिंपरी चिंचवड (pcmc) पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. शुभम लॉजमध्ये ही घटना घडली. पीडितेच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या सगळ्या प्रकरणाचा तपास तळेगाव दाभाडेचे पोलीस करत होते. पोलिसांनी 23 वर्षीय आरोपीला अटक केली असून तो तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे. तक्रारदाच्या घराशेजारी आरोपीचे नातेवाईक राहत होते. त्या परिसरात तो वारंवार येत असे. त्यामुळे आरोपीची तक्रारदाच्या 12 वर्षीय मुलीशी ओळख झाली होती. आरोपी मुलीला लॉजवर घेऊन गेला होता. येथे आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच मुलीला व तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली होती.