Pune News: पुण्यातील कामशेतमधील अवैध व्यवसायाविरोधात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके रस्त्यावर उतरले. त्यावेळी शेकडो नागरिक कामशेत पोलीस ठाण्यासमोर जमले. कार्यकर्त्यांसह पायी मिरवणूक काढून कामशेत पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अवैध दारूमुळे तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ते सकाळी उठून व्यायाम करण्याऐवजी तरुण पिढी दारू कुठे मिळवायची याचा शोध घेत आहे? अशी परिस्थिती पुणे ग्रामीण पोलिसांनी निर्माण केली होती, असा आरोप त्यांनी ग्रामीण पोलिसांवर केला आहे.


 अवैद्य दारू धंद्यावर तासाभरात कारवाई करू, असे आश्वासन कामशेत पोलिसांनी आमदार शेळके यांना नागरीकांसमोर दिले. यावेळी आमदार आणि पोलीस आमनेसामने आले होते. यासोबतच कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत असे काही आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवा, आम्ही कारवाई करू, असे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.


बेकायदेशीर व्यवसाय तरुणांना बिघडवत आहेत. आपली सत्ता बदलली म्हणून आपले विचार बदलले नाहीत. सत्ता कोणाचीही असली तरी गावोगावी हातभट्ट्या आणि गांजा चालवण्याचे प्रकार बंद करण्याची मागणी पोलीस प्रशासनाला दीड वर्षांपासून करत आहेत. अवघ्या 20 रुपयांच्या दारूमुळे तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. या सगळ्यावर आळा बसायला हवा, असं मत आमदार शेळकेंनी व्यक्त केलं आहे.


आमदार शेळके यांनी काही गावांतील अवैध दारूविक्रीच्या ठिकाणांवरून दारू आणली होती. पोलिसांना दारु दाखवून त्यांच्यावर अनेक आरोप केले. येथील पोलीस अधिकारी दीड ते दोन वर्षात कोट्यवधी रुपये गोळा करतात, असा आरोप त्यांनी केला आहे. कामशेत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करा. अवैद्य धंदे अवघ्या तासाभरात बंद करा अन्यथा येथील पोलीस बाहेरील गुंतवणूकदारांना जमिनीचा ताबा देत आहेत. आम्हाला संरक्षक हवे आहेत, खाणारे नाहीत, असा दम देखील त्यांनी दिला आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावर उतरू पण चुकीच्या कामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना जाहीर विरोध करू, असंही ते म्हणाले.


पुणे ग्रामीण परीसरासह पुण्यात देखील अवैध व्यवसायांचं प्रमाण वाढत आहे. त्यासोबतच गुन्हेगारीचं प्रमाण देखील सातत्याने वाढत असल्याने यावर प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. असं केल्यास रस्त्यावर उतरु. योग्य ती कारवाई करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.