पुणे : आंबेगाव तालुक्यामध्ये घोडनदीत दोन मुली आणि एक मुलगा बुडाल्याची घटना घडली आहे. शिणोली गावातील सायंकाळची घटना आहे. घोडनदीवरील बंधाऱ्यावर तिघे खेळायला गेले होते. तेव्हा ते तिघेही बुडाले. 17 आणि 13 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला असून आठ वर्षीय मुलाचा शोध सुरु आहे.
एफवायचं शिक्षण घेणारी अंकिता बोराडे आणि तिची मावस बहीण सेजल हुले या दोघींचा मृतदेह सापडला आहे. सेजलने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. तर सेजलचा सातवीतील भाऊ प्रज्वल हुलेचा शोध सुरु आहे.
हे तिघे सायंकाळी पाचच्या सुमारास घराबाहेर पडले आणि त्यांनी थेट बंधारा गाठला. सायंकाळचे सात वाजले तरी घरी परतले नाहीत, म्हणून कुटुंबीयांनी गावातील नागरिकांकडे चौकशी केली. तेव्हा ते बंधाऱ्याच्या दिशेने गेल्याचं समजताच, सर्वांनी तिकडे धाव घेतली.
बंधाऱ्यालगत तिघांच्या चपला दिसल्या, त्यामुळे पाण्यात शोध घ्यायला सुरुवात झाली. काही वेळात अंकिता आणि मावस बहीण सेजलचा मृतदेह पाण्याच्या कडेला आढळला. प्रज्वलचा मात्र शोध सुरु आहे. प्रज्वल आणि सेजल मावशीकडे सुट्टीसाठी आले होते.
#पुणे : घोडनदीत तीन बहिण-भाऊ बुडाले, दोन मृतदेह शोधण्यात यश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2018 10:57 PM (IST)
घोडनदीवरील बंधाऱ्यावर तिघे खेळायला गेले होते. तेव्हा ते तिघेही बुडाले. 17 आणि 13 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला असून आठ वर्षीय मुलाचा शोध सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -