पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने निगडीमधून अनुराधा पुरंदरेंना बेड्या ठोकल्या.


डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासोबत अनुराधा पुरंदरेंची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात अनुराधा पुरंदरेंचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे.

गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर अनुराधा पुरंदरे गायब झाला होता. तपास पथकांना सापडत नव्हत्या. पण त्या निगडीमध्ये एका कुटुंबीयांकडे राहत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर त्यांना आज अटक केली.

डीएसके दाम्पत्याच्या अटकेनंतर जावईही पोलिसांच्या जाळ्यात

आतापर्यंत सात जण अटकेत

या प्रकरणात 13 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर ही सातवी अटक आहे. याआधी डी एस कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, पुतणी सई वांजपे, तिचा पती केदार वांजपे (जावई), डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर आणि फायनान्स हेड विनयकुमार बंडगंडी यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर मुलगा शिरीष कुलकर्णीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 5 जूनला सुनावणी होणार आहे.

36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र

कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. डीएसकेंवर तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळ्याच्या ठपका ठेवण्यात आला आहे.

डीएसके दाम्पत्याविरोधात 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र

कुलकर्णी दाम्पत्य येरवडा तुरुंगात

डीएसके आणि हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून  17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

संबंधित बातम्या

डीएसके आणि हेमंती कुलकर्णींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

एसीत वावरणारे 'हे' सेलिब्रेटी आता जेलमध्ये घामांच्या धारांत

बँकेकडून डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा 8 मार्चला लिलाव

डीएसकेंना अॅडमिट करण्याची आवश्यकता, डॉक्टरांचा अहवाल

डीएसके पुन्हा ससूनमध्ये, चाचण्या सामान्य आढळल्यास कोठडीत रवानगी होणार

डीएसकेंच्या पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीमध्ये रुपांतर

डीएसकेंची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

डी. एस. कुलकर्णींना दिल्लीत अटक

डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून संरक्षण नाही : हायकोर्ट

डीएसकेंचा बनाव उघड, जामीन अर्जावर तातडीची सुनावणी

डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली!

डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर

"डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका

कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट