पुणे : दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटकडून तीन बांगलादेशी नागरिकांना शनिवारी अटक केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या तिघांचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.
हे तिघेही पुण्यात मजूर म्हणून काम करायचे. यातील दोघांना पुण्यातील अकुर्डी भागातून अटक करण्यात आली. तर एका संशयिताला वानवाडी भागातून अटक करण्यात आली. हे तिघेही गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात राहत होते.
बांगलादेशात दहशतवादी कारवायांमुळे बंदी असलेल्या अन्सरुल्लाह बांगला टीम या संघटनेचे सदस्य आहेत. ही संघटना अल कायदाशी संबंधीत संघटना आहे. या संघटनेला हे तिघेही आर्थिक रसद पुरवत असल्याचा एटीएसचा संशय आहे.
एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार, हे तिघंजण तिशीतल्या वयोगटातले आहेत. या तिघांकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्डसह इतरही कागदपत्रं जप्त करण्यात आले आहेत. या तिघांची नावं अद्याप कळू शकलेली नाहीत.
दरम्यान, या तिघांना कोर्टात हजर केले असता, कोर्टाने तिघांनाही 29 मार्चपर्यंत एटीएसच्या कोठडीत रवानगी केली आहे. पण यामुळे अवैध्यरित्या बांगलादेशी नागरिक भारतात राहत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
17 Mar 2018 09:57 PM (IST)
ताब्यात घेण्यात आलेल्या या तिघांचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -