पुण्यात मॉलमध्ये जाण्यास तृतीयपंथीयाला सुरक्षा रक्षकांनी रोखलं!
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 17 Mar 2018 01:14 PM (IST)
तृतीयपंथी असलेल्या सोनाली दळवी या मॉलमधील कर्मचाऱ्यांशी वादही झाला. वादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुणे : पुण्यातल्या फिनिक्स मॉलमध्ये तृतीयपंथीय व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आला. पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तृतीयपंथीय असलेल्या सोनाली दळवी मित्रासोबत शॉपिंग करायला फिनिक्स मॉलमध्ये गेल्या होत्या. गेटवरील सिक्युरीटी चेकिंगच्या वेळी सोनाली महिलांच्या रांगेत उभ्या होत्या. यावेळी महिला सिक्युरिटी गार्डने त्यांना मॉलमध्ये जाण्यापासून रोखलं. यावेळी त्यांचा मॉलमधील कर्मचाऱ्यांशी वादही झाला. वादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, मॉलमध्ये उपस्थित नागरिकांनी विनंती केल्यानंतर अखेर सोनाली यांना मॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. पाहा व्हिडीओ :