मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. मात्र नितेश राणे यांनी घेऊ इच्छित असलेल्या निर्णयाला आता जेजुरीच्या मार्तंड देवस्थानमध्ये मतभेद दिसून येत आहेत.
भाजप आमदार आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केला आहे. आता मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मात्र, या योजनेचे नाव त्वरीत बदलावे, अशी विनंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी मंत्री नितेश राणे यांना केली आहे.
मल्हार सर्टिफिकेशनवरून मार्तंड संस्थांच्या विश्वस्तांमध्ये ही मतभेद
श्री मल्हार म्हणजे खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यामुळे या योजनेचे नाव बदलण्यात यावे, अशी विनंती जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी केली आहे. याबाबत त्यांनी नितेश राणेंना एक पत्र देखील पाठवले आहे. तर मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी या मल्हार सर्टिफिकेटेशनचे स्वागत केलेलं आहे आणि जी भूमिका खेडेकर यांनी मांडली ती संपूर्णतः वैयक्तिक असल्याचे मंगेश घोणे यांनी म्हटल आहे. तसेच मी स्वतः नितेश राणे यांची जाऊन भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणार आहे आणि त्यांनी जय मल्हार नाव दिला आहे. त्याला एक प्रकारचा मंगेश होणे यांचा पाठिंबा असल्याचा त्यांनी म्हटलं आहे.
डॉ. राजेंद्र खेडेकरांनी पत्रात काय म्हटले?
आपण आज घेतलेला निर्णय अत्यंत सार्थ आहे, जेणेकरून उत्तरप्रदेश सारखाच आपण कोणाकडून मांसा विक्री खरेदी करतोय हे समजायला मदत होईल. तसेच गोमांस किंवा कुत्रे मांस विक्रीला आळा बसेल.
मात्र हे करताना एक मल्हारभक्त म्हणून महत्त्वाची सूचना करावी असे वाटते. या योजनेचे नाव आपण त्वरित बदलावे. अशी आमची आधी आपल्याला विनंती आहे. श्री मल्हार म्हणजे खंडोबा, अवघ्या महाराष्ट्राचे दैवत. ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे. देवाला फक्त पुरणपोळी किंवा चंपाषष्ठीच्या काळात वांग्याचे भरीत रोडगा नैवेद्य असतो. इतकेच नव्हे तर खंडोबा ही देवता मुक्या जनावरांवर नितांत प्रेम करणारी देवता आहे. म्हणून देवाच्या बाजूला नेहमी घोडा, कुत्रे, बैल आदी प्राण्यांचा सहवास असतो.
मुळातच या योजनांना कोणत्याही हिंदू देवतांचे नाव देणे हे चुकीचे- डॉ. राजेंद्र खेडेकर
मुळातच या योजनांना कोणत्याही हिंदू देवतांचे नाव देणे हे चुकीचे आहे. मी जरी श्री मार्तंड देव संस्थानाचा विश्वस्त असलो, तरी विश्वस्त मंडळाची भूमिका या विषयी काय आहे, मला माहीत नाही. मात्र, माझी भूमिका फक्त नाव बदलण्यात यावे एवढीच आहे. त्यामुळे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की, या योजनेचे नाव मल्हार सोडून दुसरे कोणतेही ठेवावे, असे श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
हे ही वाचा