पुणे : इंग्रजांच्या नंतर न्यायव्यवस्थेत काहीच बदल झाले नाहीत. लोकसंख्या वाढली, गुन्हे वाढले, गुन्हेगारांची संख्या वाढली पण् न्यायधीशांची संख्या तेवढीच राहीली. न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याची जबाबदारी संसदेची आणि न्यायपालिकेची देखील आहे, असे मत निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले आहे.


सावंत म्हणाले, पोलिसांनी देखील त्यांच्या अन्वेषण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. मागील 70 वर्षांमध्ये आपण कायद्याच्या मार्गावरुन वाटचाल करत असताना पुढं जाण्याऐवजी मागं निघालो आहोत. एन्काऊंटर नंतर लोकांनी आनंद साजरा केला त्याला दोष देता येणार नाही. वर्षानुवर्षे खटल्याचा निकाल लागत नसेल तर लोक आनंद साजरा करणारचं आहे. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे.

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेचं देशभरातून स्वागत होत आहे. खरंतर चार दिवसांपूर्वी जेव्हा हैदाराबादमधून आरोपींना पोलिस घेऊन जात होते, त्यावेळी पोलिसांबद्दल आक्रोश होता. परंतु आता त्या एन्काऊंटरचं रुपांतर फुलांमध्ये झालं आहे. फुलांचा वर्षाव करुन, राखी बांधून नागरिक पोलिसांचं कौतुक केलं आहे. एन्काऊंटरनंतर पीडितेच्या घराजवळ राहणाऱ्या लोकांनी पोलिसांनी राखी बांधली. काही जणांनी मिठाई वाटली आणि पोलिसांचं तोंड गोड केलं.

गेल्या काही वर्षांत न्यायव्यवस्थेला समांतर यंत्रणा उभी राहिली आहे. पण या यंत्रणेच्या मार्फत न्याय मिळवणं फक्त पैसेवाल्यांनाच शक्य आहे. कारण गुंड फक्त पैशासाठी राबतात. अमेरिकेसारख्या विकसीत देशांत अशा खटल्यांमध्ये न्याय मिळण्यासाठी आपल्यापेक्षा एक चतुर्थांश कमी वेळ लागतो, असे देखील सावंत म्हणाले.

27 नोव्हेंबरला देश हादरला

हैदराबाद शहराबाहेर असलेल्या शमशाबादमध्ये 27 नोव्हेंबरच्या चार ट्रक चालक आणि क्लीनरने महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पेट्रोल टाकून तिला जाळून मारलं होत. या घटनेनंतर दोषींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. त्यासाठी देशभरात आंदोलनं होतं होती.