पुण्यातील एका प्रतिष्ठीत सराफा दुकानाच्या बँक अकाऊंटवर हॅकर्सनी डल्ला मारलाय. या सराफा दुकानाचे महाराष्ट्र बँकेत असणारे बँक अकाउंटचे ऑनलाईन बँकिंग अकाउंट हॅक करण्यात आले. त्यातून एकूण 2.98 कोटी रुपये इतर एकूण 20 अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्यात आले आहेत. सायबर पोलिस स्टेशनकडून प्राथमिक अर्ज चौकशीत लाभार्थी बँक अकाऊंट फ्रिज करण्यात आली आहेत. यातील आतापर्यंत 18 लाख रुपये फ्रीज करण्यात आलेत. प्राथमिक चौकशीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलाय.
ऑनलाईन अॅप केले हॅक -
बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी महासिक्युअर अॅप वापरले जाते. या बँक अकाऊंटला ग्राहकाचा मोबाईल नंबर लिंक असतो. स्थानिक शाखांमधून जमा होणारी रक्कम महासिक्युअर अॅपद्वारे बँक ऑफ महाराष्ट्राच्या सिंहगड रोड शाखेत ट्रान्सफर केली जाते. सराफी पेढीतील काही कॉम्प्युटरवर महासिक्युअर अॅप इन्स्टॉल केलेले आहे. 11 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता त्यांच्या महासिक्युअर अॅपमध्ये लॉगइन होत नव्हते. त्यानंतर त्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधला आणि आमचा सेक्युरिटी प्रश्न बदलला असल्याचे सांगितले. हेल्पलाईनवरुन पुन्हा दोन तासांनी लॉगइन करायला सांगितले. तरीही लॉगइन झाले नाही. 12 नोव्हेंबर व 13 नोव्हेंबरलाही लॉगइन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यात दुसऱ्या युझरकडून लॉगइन झाल्याचे आढळले. त्यानंतर अॅपचा पासवर्ड रिसेट केल्यानंतर त्यांच्या खात्यातून 2 कोटी 98 लाख 40 हजार रुपये कमी झाल्याचे दिसून आले.
संबंधित बातम्या -
महिलांनो सावधान! व्हायरसच्या मदतीने हॅकर्स तुमचे फोटोही हॅक करु शकतात
स्मार्ट टीव्ही हॅक करु पती-पत्नीचा व्हिडीओ, खासदार अमर साबळेंकडून कारवाईची मागणी
Online Fraud I बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा I एबीपी माझा