पुणे : ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या बंगल्यात चोरी झाली आहे. जंगली महाराज रस्त्यावरीस प्रभा अत्रेंच्या स्वरमयी गुरुकुल बंगल्यात शनिवारी पहाटे चोरी झाली. प्रभा अत्रे या काल पहाटे रियाज करित असताना हा प्रकार घडला आहे.


जंगली महाराज रस्त्यावरील शिवसागर हॉटेल मागील बाजूस स्वरमयी गुरुकुल या बंगल्यात प्रभा अत्रे राहातात. शनिवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे रियाज करत होत्या. यावेळी त्यांचे 3 मोबाईल आणि 2 हार्ड डिस्कची चोरी झाली. यावेळी त्यांच्या घरामध्ये एक विद्यार्थिनी आणि त्यांचा भाचा होता.

रियाज करताना प्रभा अत्रेंना कुणाचीतरी चाहूल जाणवली. मात्र घरातील कोणी असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. मात्र थोड्या वेळाने पाहिल्यावर हॉलमधील 3 मोबाईल आणि 2 हार्ड डिस्क नसल्याचं त्यांना दिसून आलं. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेबाबत बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरण पाहण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.