Pune Navale Bridge Accident: पुणे- बंगलोर हायवेवर (Pune Bangalore Highway) नवले पुलावर (Navale Bridge Accident) रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रकने एकाच वेळी 24 वाहनांना धडक दिली. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र तापासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर समोर आली.
अपघाताचं नेमकं कारण काय?चालकाने उतार असल्याने इंजिन बंद केले आणि गाडी न्यूट्रलमध्ये टाकून तो चालक गाडी चालवत होता. यात मात्र वेग प्रचंड वाढला आणि नियंत्रण सुटलं. यावेळी ब्रेक न दाबता आल्याने त्याच्या ट्रकने गाड्या चिरडल्या गेल्या. या दुर्घटनेनंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. कालपासून पोलीस या चालकाचा पोलीस शोध घेत आहे. मणिराम छोटेलाल यादव असे चालकाचे नाव असून तो मध्य प्रदेशचा रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अपघातात 13 जणं गंभीर जखमीनवले पुलाजवळ झालेल्या अपघातात 13 जणं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नवले हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, रुबी हॉल हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर, जगताप हॉस्पिटल या सगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
1) राहुल भाऊराव जाधव रा.वारजे2) शुभम विलास डांबळे रा. सदर3) तुषार बाळासाहेब जाधव रा. सदर4)आनंद गोपाळ चव्हाण रा. सहयोग नगर, पुणे5) राजेंद्र देवराम दाभाडे रा. माणिकबाग पुणे6) साहू जुनेल रा.कोंढवा पुणे7)ऑस्कर लोबो रा. कोंढवा पुणे8) मधुरा संतोष कारखानीस वय 42 वर्ष रा. वनाज 9)चित्रांक संतोष कारखानीस वय 8 वर्ष10) तनीषा संतोष कारखानीस वय 16 वर्ष11)विदुला राहुल उतेकर वय 45 वर्ष रा. सदर12) अनघा अजित पभुले वय 51 वर्ष रा. वडगाव पुणे13)अनिता अरुण चौधरी वय 54 वर्ष रा. राहटणी चौक, पुणे
अपघातामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरणकाही दिवसांपूर्वी पुण्यातील नवले पुलावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी आता एक नवा प्रस्ताव समोर आला होता. नवले पूल आणि त्यापासून काही अंतरावर असलेला वडगाव पूल जोडण्यासंदर्भातला प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे महापालिकेला देण्यात आला होता. या ठिकाणी अपघातांमध्ये सतत होणारी जीवितहानी लक्षात घेता या प्रस्तावाची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.