Malegaon Sahakari Sakhar Karkhana : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Sahakari Sakhar Karkhana)  संचालक मंडळाला साखर आयुक्तालयानं चपराक दिली आहे. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 10 गावे नव्यानं जोडण्याचा निर्णय माळेगावच्या संचालक मंडळानं आवाजी मतदानाने मंजूर केला होता. या निर्णयाला प्रादेशिक सह संचालकांनी स्थगिती दिली आहे. रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी 10 गावे नव्यानं जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी साखर आयुक्तालायकडे केली होती.
 
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 10 गावे नव्याने जोडण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला होता. हा निर्णय घेताना सभासदांनी कडाडून विरोध केला होता. तरी देखील हा निर्णय संचालक मंडळाने आवाजी मतदानाने मंजूर केला होता. त्यामुळं  रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी या निर्णयाला विरोध करत साखर आयुक्तालयाकडं तक्रार दाखल केली होती. अखेर 10 गावे नव्याने जोडण्याचा निर्णयाला स्थगिती दिली आहे.


वार्षिक सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला होता


बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला होता. गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालक मंडळाने विविध विषयांना मंजूरी दिली होती. विषय मंजूर-मंजूर अशा घोषणा देत संचालकांनी सभेतून काढता पाय घेतला. मोठ्या संख्येनं सभासद हे नाही-नाहीच्या घोषणा देत होते. या गोंधळातच विषय मंजूर करुन सभा गुंडाळण्यात आली. गोंधळाच्या वातावरणातच माईकची मोडतोड करुन सभासदांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळालं.


कारखाना क्षेत्रातील 10 गावे ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्याला विरोध 


बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दहा गावांचा समावेश करण्यासाठी ही सभा आयोजीत करण्यात आली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकूण 11 विषयावर चर्चा होणार होती. त्यातील 8 नंबरचा विषय हा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील 10 गावे ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्याचा विषय होता. जेव्हा 8 नंबरचा विषय चर्चेला आला तेव्हा सुरुवातीपासूनच या विषयाला अनेक सभासदांचा विरोध होता. गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालक मंडळाने सर्व विषयांना मंजूर-मंजूर अशा घोषणा देत सभेतून काढता पाय घेतला होता. मोठ्या संख्येने सभासद हे नाही नाहीच्या घोषणा देत होते. जवळपास 80 टक्के सभासद 10 गावे सामावून घेण्यास विरोध करीत होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Baramati News : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, विषयांना मंजूरी देत संचालकांचा काढता पाय