पुणे: 'पुणे तिथे काय उणे' हे अनेकदा आपण पाहतो, ऐकतो. पुण्यात जशा अनेक गोष्टी फेमस आहेत. त्यामध्ये सर्वांधिक चर्चेत असतात त्या पुणेरी पाट्या, या पुणेरी पाट्या अनेकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकदा आपण पाहतो. अनेकदा या पाट्यावर लिहून पुणेकर टोमणे मारतात. मात्र, आता सोशल मिडियावर अशा एका पाटीची जोरदार चर्चा आहे, ज्याचा आपण कधी विचार केला नसेल. ही पाटी एका तरूणाने हातात घेऊन एका चोराला साद घातली आहे. एका तरूणाची दुचाकी चोरीला गेली, ती दुचाकी त्याला त्याच्या आईने घेतलेली होती. त्याच्या आईची ती शेवटची आठवण आहे, त्यामुळे या तरूणाने हातात एक फलक घेऊन त्यावर लिहून दुचाकी चोराला विनंती केली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या दिवशी तरूणाने आपली दुचाकी संध्याकाळी सातच्या सुमारास कोथरूड कर्वे पुतळ्या परिसरात बंद पडली. त्यानंतर त्याने आपली दुचाकी कोथरूड गावठाणलगत असलेल्या कमानीच्या रस्त्याजवळ मित्राच्या घराजवळ लावली.त्यानंतर तो रिक्षाने घरी गेला. रविवारी दिवसभर कामांमुळे त्याला दुचाकी आणायला वेळ मिळाला नाही. ज्या मित्राच्या घराजवळ दुचाकी लावली होती, तो रात्री घरी परतला तेव्हा त्याला दुचाकी दिसली नाही.  त्यानंतर तरूणाने आणि त्याच्या मित्राने आसपासच्या शोध घेतला तपास केला. मात्र, दुचाकी सापडली नाही. जवळच्या पोलिस चौकीत देखील त्यांनी दुचाकीचा शोध घेतला. पण ती न मिळाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही दुचाकी त्याच्या आईची आठवण असल्याने ती परत करण्यासाठी पोस्टर तयार केले करून चोराला भावनिक आवाहन केले आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


हातात फलक घेतलेल्या तरूणाचे नाव अभय चौगुले असं आहे. कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ कोथरूड गावठाण कमानीच्या रस्त्यालगत त्याची दुचाकी कोणीतरी चोरी केली. तरूणाने त्याच्या मित्रांसोबत आसपासच्या परिसरात दुचाकीचा शोध घेतला; परंतु गाडी कुठेच मिळाली नाही, त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर त्याने दुचाकी चोरीला गेल्याचा फलक हातात घेऊन तो रस्त्यावर उभा राहिला आहे. या फलकासोबतचे त्याचे फोटो आणि फलकावर लिहलेला मजकूर मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावर व्हायरल होत असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे, चोराला त्याची दुचाकी परत करण्याची विनंती त्याने केली आहे.


फलकावर काय लिहलं आहे?


फलकावर तरूणाने चोराला भावनिक साद घालत गाडी परत करण्याची विनंती केली आहे. यामध्ये त्याने आपला फोन नंबर आणि दुचाकीचा नंबर लिहला आहे. माझी गाडी चोरणाऱ्या चोराला नम्र विनंती, आईने खुप कष्ट करून 12 वित गाडी घेतली होती, आई ची शेवट पी आठवण आहे, Plz परत करा "Black Activa MH14B26036" M-9766617464