पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुर, मावळ, पुणे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या मतदानावेळी अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याचं पाहायला मिळालं तर कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात तू तू मै मै पाहायला मिळालं. त्यातच मावळ लोकसभेत ईव्हीएम मशीनची मांडणी चुकीच्या पद्धतीने केली, असं म्हणत ठाकरे गटाच्या शहाराध्यक्षाने गोंधळ घालणं चांगलंच महागात पडलं आहे.
मावळ लोकसभेत ईव्हीएम मशीनची मांडणी चुकीच्या पद्धतीने केली, असं म्हणत ठाकरे गटाच्या शहाराध्यक्षाने गोंधळ घातला. या प्रकरणी सचिन भोसलेंना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करायला नेहले आहे. पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये ही घटना दुपारच्या सुमारास घडली. खिंवसरा शाळेतील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची मांडणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप भोसलेंनी केला. बराच वेळ निवडणूक कर्मचाऱ्यांनी भोसलेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मतदान केंद्रावर गर्दी करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत होते. हे पाहता निवडणूक कर्मचाऱ्यांनी वाकड पोलिसांना पाचारण केलं. काही वेळातच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी निवडणूक कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वाकड पोलिसांनी भोसलेंना अटक केलं आहे. सध्या त्यांना न्यायालयात हजर करायला नेले आहे.
मावळ लोकसभेला काय स्थिती?
शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष असलेल्या मावळ लोकसभेमध्ये सुद्धा दुपारी एक वाजेपर्यंत पनवेल मतदारसंघांमध्ये 26.93 टक्के मतदानाची नोंद झाली. कर्जतमध्ये 29.47 टक्के मतदानाची नोंद झाली. उरणमध्ये 29.6 टक्के मतदानाची नोंद झाली. मावळमध्ये 28.3 टक्के मतदानाची नोंद झाली. चिंचवडमध्ये 26.12 टक्के मतदानाची नोंद झाली. पिंपरीमध्ये 23.96 टक्के मतदानाची नोंद झाली. तर मावळमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत पनवेल मतदारसंघांमध्ये 34.93, कर्जतमध्ये 38.3, उरणमध्ये 42.89, मावळमध्ये 37.5, चिंचवडमध्ये 35.8 तर पिंपरीमध्ये 33.74 मतदानाची नोंद झाली आहे.
मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात तगडी लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचा जंग जंग पछाडला. अनेक महत्वाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. विविध प्रश्न आणि समस्या मांडून मावळकरांना वेगवेगळी आश्वासनं दिले. त्यानंतर दोन्ही उमेदवारांकडून काही प्रमाणात संभ्रम निर्माण कऱण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यकर्त्यांना दमदाटी झाल. अखेर आज मतदानाचा दिवस आला तरीही एकमेकांवर बारीक लक्ष असल्याचं दिसत आहे. कोण आचारसंहितेचा भंग करत आहेत. कोणाचे कार्यकर्ते काय करत आहेत? याकडे दोन्ही उमेदवारांचं लक्ष आहे.
इतर महत्वाची बातमी-