पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी ( Pune Loksabha election) आज मतदान पार पडत आहे. मतदानासाठी पुणेकरांसाठी अनेक बुधवर गर्दी करताना दिसत आहे. एकिकडे मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या आहे तर दुसरीकडे ऊन डोक्यावर आलं असतानादेखील मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहे. याच उन्हात अनेक मतदारांना तात्कळत उभं राहावं लागत आहे. बुधवर योग्य नियोजन नसल्याचं पाहून मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रशासनावर संतापल्याचं पाहायला मिळालं. 


पुण्यात अनेक ठिकाणी मतदानासाठी गर्दी झाली. पुण्यातील पौड रोडवरील MIT शाळेतदेखील मतदानासाठी गर्दी झाली होती. याचवेळी मुरलीधर मोहोळ मतदान केंद्राजवळ पोहचले आणि त्यांनी ही गर्दी पाहिली. या ठिकाणी चार पोलींग बुथ होते. मात्र एकच मोठी रांग लागली होती आणि अनेक नागरिक उन्हात उभे असल्याचं दिसलं. हा सगळा प्रकार पाहून मुरलीधर मोहोळ चांगलेच संतापले. अनेक निवडणूक प्रशासक बुधवर काम करत होते. मात्र त्यांनी चार बुध असूनदेखील एकाच मोठ्या रांगेत नागरिकांना उभं ठेवलं. परिणामी अनेक नागरिकांना उन्हातान्हात तात्कळत राहावं लागलं. 


हे पाहून मुरलीधर मोहोळांनी निवडणूक अधिकारी यांना चांगलंच सुनावलं. मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या 4 रांगा करायला सांगितल्या. प्रत्येक बुथला जायला स्वतंत्र रांग असणं अपेक्षित असताना मतदान केंद्रावरचे अधिकारी एकाच रांगेतून सोडत होते. एवढावेळ मतदानासाठी पुणेकरांना उन्हात थांबवलं तर मतदार मतदान न करताच परत जातील, योग्य नियोजन करा, असं म्हणत मुरलीधर मोहोळांनी चांगलंच सुनावलं.


पुण्यात बोगस वोटींग?


फर्स्ट टाईम वोटर ते सिनियर सिटिझन, पुण्यात बोगस वोटिंग सुरू असल्याचं दिसतंय. एकाही बूथवर एकही सीसीटिव्ही नाही, एकही अधिकारी मदत करायला तयार नाही मग आम्ही मतदान करायचं तरी कसं? जर पहिली वेळ असताना हे होत असेल तर पुढे परत मतदान करायची इच्छा कशी होईल? अशी प्रतिक्रिया फर्स्ट टाईम वॉटर गौतमीने दिली. तर अनेक वर्षांपासून रत्नाकर दळवी हे कोथरूड मध्ये मतदान करत आहेत मात्र इतकं असूनही त्यांच्या नावावर वेगळच कुणीतरी मतदान करून गेलं आणि निवडणूक अधिकारी यांनी आम्हाला कळलं नाही असं उत्तर दिलं.


इतर महत्वाची बातमी-


बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर


Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार