...आणि भरधाव टेम्पो थेट विहिरीत कोसळला!
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2018 12:15 PM (IST)
वाकडमधील हॉटेल सिल्व्हर स्पूनसमोरील रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून रखडलेले आहे.
पुणे : भरधाव टेम्पो थेट विहिरीत कोसळल्याची घटना वाकडमध्ये घडली. वाकडमधील हॉटेल सिल्व्हर स्पूनसमोरील रस्त्यावर मधोमध विहीर आहे. इथे मध्यरात्रीच्या वेळेस टेम्पो विहिरीत कोसळला. सुदैवाने या अपघतातून टेम्पोचा चालक बचावला आहे. वाकडमधील हॉटेल सिल्व्हर स्पूनसमोरील रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून रखडलेले आहे. त्यात रस्त्याच्या अगदी मधोमध विहीर आहे. यामुळे चालकाला काही कळण्याआधीच टेम्पो विहिरीत पडला. आता तरी महापालिका हा रस्ता तातडीने पूर्ण करणार की एखादा बळी जाण्याची वाट पाहणार आहे, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.